*कोकण Express*
*जिल्हा बँक अध्यक्ष ,उपाध्यक्षांचे नारायण राणे यांनी केले अभिनंदन….*
*सहकारातील भावी वाटचालीला दिल्या शुभेच्छा!*
*निवड प्रक्रियेनंतर दिली बँकेला भेट…*
*कणकवली : मयुर ठाकूर*
जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनिष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अभिनंदन केले.यावेळी त्यांच्या सहकारातील भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर श्री. राणे यांनी जिल्हा बँकेला भेट देऊन या दोघांसह सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, यासह विविध घोषणा देत फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली.