*कोकण Express*
*कासार्डेतील विद्यार्थी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यात अग्रेसर*
*विद्यालयाच्या 560 हुन अधिक विद्यार्थ्यानी घेतला लसीकरणाचा लाभ*
*कासार्डे ः संजय भोसले*
देश कोरोणाच्या तिसऱ्या लाटेच्या विळख्यात जात असताना शासनाने घेतलेल्या लसीकरण मोहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून सिंधुदुर्ग जिल्हाही मागे नाही. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता 15 ते 18 वयोगटातील केलेल्या लसीकरण मोहीमे मध्ये कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अंदाजे 560 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतल्याचे आरोग्य सेविका दर्शना सुभाष धुरी यांनी सांगितले.
विद्यालयातील काही हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच विद्यार्थी या मोहिमेपासून वंचित असले तरी त्यांनाही या प्रवाहात आणले जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. कासार्डे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीमती एस. एस. पालांडे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या मोहिमेत श्रीमती दर्शना सुभाष धुरे, (आरोग्य सेविका),श्री एन.एन. सामंत ,(आरोग्य सेवक),सौ. जी. जी. शिरकर (आरोग्य सेविका),सौ.ए.एल. किर्लोस्कर (आरोग्य सेविका),समिका सतीश राणे (आशा) , प्रणाली भीमराव जाधव (अाशा) ,वैशाली नारायण केसरकर (मदतनीस), अनिता आत्माराम साटम (मदतनीस ),आणि अश्विनी घुगे (सी.एच.ओ.)यांनी परिश्रम पुर्वक विद्यार्थ्यांना नस देण्याचे कार्य केले.
त्यांना शाळा व्यवस्थापन समिती,प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाची साथ दिली.