*कोकण Express*
*मराठी पाट्या संदर्भात उशिरा का होईना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दखल महाराष्ट्र सरकारला घ्यावी लागली गुरुदास गवंडे तालुकाध्यक्ष मनसे सावंतवाडी*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
दुकानाच्या पाट्या मराठीत असण्याबाबत मनसे अध्यक्ष राज साहेब वारंवार सांगत होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुकानाच्या पाट्या फोडल्या अनेक दुकानदारांनी पाट्या मनसेच्या दणक्यामुळे मराठीत केल्या परंतु आता (नोकरीचे व सेवाशर्ती चे विनियमन अधिनियम 2017) अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत होते यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक तक्रारी शासन दरबारी केल्या होत्या त्याचाच विजय झाला आहे अधिनियम 2017 यात सुधारणा केल्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकान दारावरील पाट्या आता मराठीतच करावे लागतील बहुसंख्य दुकानदारांना आता मराठीतच देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षर यापेक्षा लहान ठेवता येणार नाही तेव्हा उशिरा का होईना घेतलेल्या निर्णयाचं मनसेतर्फे स्वागत असे मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.