*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी, उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर*
*सिंधुदुर्ग:*
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीने विजय मिळविला.भाजपा चे मनीष दळवी अध्यक्ष तर उपाध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर यांचा ११ विरुद्ध ७ मतांनी विजय झाला.या विजयाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाळ प्रांत अधिकारी वंदना खरमळे यांनी करताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
दरम्यान बहुमत नसतांनाही महाविकास आघाडी ने अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड प्रतिष्ठेची केली होती. महाविकास आघाडीचे अध्यक्ष पदाचे उमेदवार व्हीकटर डांट्स आणि उपाध्यक्ष पदाचे उमेदवार सुशांत नाईक यांचा ७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला.मतदान गुप्त पध्दतीने करण्यात आले.