पुढील प्रत्येक निवडणुकीत भाजपचाच विजय – ना. नारायण राणे

पुढील प्रत्येक निवडणुकीत भाजपचाच विजय – ना. नारायण राणे

*कोकण Express*

*पुढील प्रत्येक निवडणुकीत भाजपचाच विजय – ना. नारायण राणे*

*कार्यकारीणीच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप…!*

*भाजप जिल्हा कार्यकारीणी बैठकीत दिला कानमंत्र…!*

*कणकवली : मयुर ठाकूर*

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत ज्या उत्साहाने, निर्धाराने आणि एकजुटीने काम केलात तोच उत्साह यापुढील प्रत्येक निवडणुकीत कायम ठेवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींपासून लोकसभेपर्यंत सर्व सत्‍तास्थानांवर भारतीय जनता पार्टीच बहुमताने विजयी होणार, तुम्हा कार्यकर्त्यांच्या कामावर आणि मेहनतीवर माझा विश्‍वास आहे अशा शब्दात भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या जिल्हा कार्यकारीणीच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि विजयाचा कानमंत्रही दिला.

ओसरगाव महिला भवन येथे बुधवारी दुपारी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या जिल्हा कार्यकारीणीची बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आ. अजित गोगटे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे, जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत, जयदेव कदम, संदीप कुडतरकर, रणजीत देसाई, भाई सावंत आदींसह सर्व सभापती, नगराध्यक्ष, सर्व विभागांचे अध्यक्ष आणि कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते.

ना. राणे म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी खुप मेहनत घेतात याचा मला अभिमान आहे. खरेतर कोणतीही निवडणुक भारतीय जनता पार्टीसाठी अवघड नाही, मात्र बेसावध राहू नका. प्रत्येकवेळी सावध राहून काम करा, कामात सातत्य ठेवा, जनतेशी कायम संपर्कात राहून त्यांचे प्रश्‍न सोडवा, केंद्र सरकाच्या माध्यमातून झालेली आणि होऊ घातलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा मग यश तुमचेच असेल असा विश्‍वास यावेळी ना. नारायण राणे यांनी व्यक्‍त केला. दरम्यान जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा निर्णय केंद्रीयमंत्री नारायण राणेच घेतील असे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!