*कोकण Express*
*वैभववाडी शिवसेनेच्या वतीने नाईक यांचा नुतन बॅंक संचालक व युवासेना जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल करण्यात आला सत्कार*
युवा सेनेच्या माध्यमातून ‘घर तेथे युवा सैनिक’ संकल्पना तालुक्यात राबविण्यात येणार
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
जिल्ह्यात युवासेनेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार असून घर तिथे युवा सैनिक ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.असे प्रतिपादन नुतन युवासेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बॕक संचालक सुशांत नाईक यांनी केले.
युवासेना जिल्हाप्रमुखपदी व बॕंक संचालक पदी निवड झाल्यानंतर प्रथमच वैभववाडी येथील शिवसेना कार्यालयात त्यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी नाईक बोलत होते.आगामी काळात तालुक्यातील तीनही जि.प.मतदार संघानिहाय गाववार बैठकी घेऊन शिवसेना घराघरात पोहचविणार आहोत.तसेच घर तिथे युवा सैनिक ही संकल्पना राबविणार असल्याचे त्यांनी वैभववाडी शिवसेनेचेच्यावतीने करण्यात आलेल्या सत्कारानंतर सांगितले.
यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.शिवसेना घराघरात व युवकापर्यंत पोहचविण्यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक हे काम करतील.त्यांना सर्वतोपरी सहकार्य करु असे रावराणे यांनी सांगितले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, जि.प.सदस्या दिव्या पाचकुडे,संभाजी रावराणे, गितेश कडू,स्वप्निल धुरी, रविंद्र रावराणे, संजय चव्हाण,दिगंबर पाटील, रमेश तावडे, सुनिल रावराणे,बाबा मोरे, विलास पावसकर आदी उपस्थित होते.