*कोकण Express*
*जामसंडे शाळेचं शिष्यवृत्ती परीक्षेत दणदणीत यश*
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२०-२०२१ मध्ये जामसंडे नंबर १ या प्रशालेच्या चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. या प्रशालेचे एकूण ९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र यामध्ये ४ विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत आले आहेत. यामध्ये शिवशंकर राजेंद्र बिरादार, उदी उमेश कुलकर्णी, शार्दुल दिनेश दळवी, तनिष्का सचिन घुंगरेपाटील ही ४ मुले गुणवत्ता यादीत आली आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्रीमती विनया सातार्डेकर केंद्रप्रमुख उल्हास मुंबरकर, गटशिक्षणाधिकारी प्रजापति थोरात, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय तेली यांनी अभिनंदन केले या विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक दिनेश दळवी दीपिका पालकर, रघुनाथ बोडेकर यांचे मार्गदर्शन लाभले