*कोकण Express*
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने महामृत्युंजय जपाचे आयोजन*
*वेंगुर्ले चे ग्रामदैवत रामेश्वर चरणी महामृत्युंजय जप करुन पंतप्रधानांना दीर्घायुष्य लाभण्यासाठीची मागणी*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
पंजाब दौरयावर असताना देशाचे लाडके पंतप्रधान मान.नरेंद्रभाई मोदी यांच्या सुरक्षीतेत पंजाब मधील काँग्रेस सरकारने हेतुपुरस्सर कुचराई केली त्यामुळे पंतप्रधानांच्या जिवीताला धोका निर्माण झाला . शत्रूच्या षडयंत्रापासुन त्यांचे रक्षण व्हावे व त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सोमवार दिनांक १० जानेवारी रोजी वेंगुर्लेचे ग्रामदैवत श्री.देव रामेश्वर चरणी महामृत्युंजय जपाचे आयोजन करण्यात आले होते .
महामृत्युंजय जपाचे पौरोहित्य विश्व हिंदु परिषद , वेंगुर्लेचे प्रखंड प्रमुख अरुण गोगटे यांनी केले . यावेळी पुरोहित म्हणून ब्राम्हण मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत रानडे , कीरण ताम्हणकर ,अजित दामले , मयुरेश फाटक , कौशल नातु यांनी महामृत्युंजय जपाचे पठण केले .
यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व महिला मोर्चा च्या ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर यांनी गणेश पुजन करून महामृत्युंजय जपाची सुरुवात केली . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , नगराध्यक्ष राजन गिरप , उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर , महीला मोर्चा च्या अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे , जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक – वसंत तांडेल व बाळा सावंत , नगरसेवक प्रशांत आपटे व धर्मराज कांबळी , विश्व हिंदु परिषदेचे महामंत्री आपा धोंड , आशिष पाडगावकर , ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता.चिटनीस समीर कुडाळकर , ता.का.का.सदस्य बिट्टु गावडे , किसान मोर्चा चे ज्ञानेश्वर केळजी , महिला मोर्चा च्या रसीका मठकर वृंदा मोर्डेकर – आकांक्षा परब इत्यादी उपस्थित होते .

