स्वेच्छा मरणाची परवानगी द्या

स्वेच्छा मरणाची परवानगी द्या

*कोकण  Express*

*स्वेच्छा मरणाची परवानगी द्या !*

*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एसटी कर्मचाऱ्यांची निवेदन पत्राद्वारे मागणी*

*मालवण ः प्रतिनिधी*

राज्य शासनात विलानीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी यांचा संघर्ष सुरू आहे. शासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगत मालवण आगारीतील एसटी कर्मचारी यांनी स्वेच्छा मरणाच्या परवानगी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन पत्राद्वारे केली आहे.

मालवण तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार जी एम कोकरे यांना मुख्यमंत्री यांना देण्यात येणारे निवेदन मालवण एसटी कर्मचारी काका खोत, हेमंत तळवडकेकर, दीपक ढोलम व अन्य कर्मचारी यांच्या वतीने मंगळवारी देण्यात आले. या निवेदन पत्रावर मालवण आगारातील सुमारे दीडशे कर्मचारी यांच्या स्वाक्षरी आहेत.

मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात असेही म्हटले आहे, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून राज्य सरकारी कर्मचारी यांच्या प्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदानिहाय वेतनश्रेणी देऊन आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे. आम्हा एसटी कर्मचारी यांना जीवदान द्यावे. अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी. अशी मागणी कर्मचारी यांनी निवेदन पत्रातून केली आहे.

फोटो : मालवण नायब तहसीलदार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणारे निवेदन देताना मालवण आगारातील एसटी कर्मचारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!