*कोकण Express*
*उगवाई नदी गाळ मुक्त आणि रस्ते दुरूस्तीसाठी निधी द्या…!*
*फोंडाघाटवासीयांची मागणी; पालकमंत्र्यांना दिले निवेदन….!*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
फोंडाघाट येथील उगवाई नदी गाळमुक्त करण्याबरोबरच घाट रस्ता आणि फोंडाघाट पंचक्रोशीतील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी निधी द्या अशी मागणी फोंडाघाटवासीयांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आज फोंडाघाटवासीयांच्यावतीने जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिले.
जिल्हा नियोजन बैठकीपूर्वी फोंडाघाटवासीयांसह जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना फोंडाघाटमधील समस्यांचे निवेदन दिले. यात उगवाई नदी गाळमुक्त करण्यात यावी. पुराचे पाणी येण्याचा धोका असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात यावी. तसेच साेळा किलोमिटरचा घाटरस्ता खराब झाला आहे. त्याची पूर्णत: दुरूस्ती करण्यात यावी आणि पंचक्रोशीतील नादुरूस्त रस्ते डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना श्री.आग्रे यांच्या समवेत शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत, काका कुडाळकर, सुशांत नाईक, राजा शिरोडकर इत्यादी उपस्थित होते.