*कोकण Express*
*कणकवली उपसभापती प्रकाश पारकर यांचा राजीनामा..*
*कणकवली : मयुर ठाकूर*
कणकवली प.सं.चे उपसभापती, भजनी बुबा प्रकाश पारकर यांनी आपल्या उपसभापती पदाचा राजीनामा आज दिला आहे. भारतीय जनता पार्टीने उपसभापती पदाचा दिलेला कार्यकाल पूर्ण होताच प्रकाश पारकर यांनी आपला राजीनामा स्वईच्छेने सभापती मनोज रावराणे यांच्याकडे मंजुरीसाठी सुपूर्द केला. प्रकाश पारकर यांनी गेल्या वर्षात उपसभापती म्हणून महत्वपूर्ण असे काम केले आहे.
ग्रामीण भागात जाऊन तेथील ग्रामीण जनतेचे प्रश्न जाणून घेऊन शासनाच्या विविध योजनांचा फायदा लाभार्त्याना मिळवून दिला. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेवक, सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बुवा प्रकाश पारकर यांनी सातत्याने काम केले आहे. त्यामुळे पुढील येत्या काळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी स्वईच्छेने हा राजीनामा दिला असल्याचे उपसभापती प्रकाश पारकर यांनी सांगितले.