पालकमंत्र्यांनी कणकवलीतील शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर बाबत दिला निर्णय

पालकमंत्र्यांनी कणकवलीतील शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर बाबत दिला निर्णय

*कोकण Express*

*पालकमंत्र्यांनी कणकवलीतील शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर बाबत दिला निर्णय*

*आधी स्टॉल हटवून जमिन ताब्यात घेणार नंतरच अधिकृतपणे पुतळा स्थलांतर करणार*

*१६ जानेवारी रोजी आर्किटेक्ट येऊन पाहणी करणार असल्याची माहिती*

*कणकवली : मयुर ठाकूर*

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरणबाबत निर्णय देताना पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवाजी चौक मित्रमंडळ व सकल मराठा समाज प्रतिनीनिधींनी सुचवलेल्या दिपणाईक वर्कशॉप जवळील जागेत पुतळा स्थलांतरण करण्यास मान्यता दिली.मात्र सदर शासकीय 18 गुंठे जागेतील अतिक्रमण केलेल्या सर्व स्टॉलधारकांना नोटीस काढून सर्व जमीन ताब्यात घेऊन नंतरच अधिकृतपणे पुतळा स्थलांतरित केला जाईल असे सांगितले. असे झाल्यास सध्या या जागेत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिक व कामगार अशा 40 कुटुंबांच्या रोजगारावर पाणी फिरणार आहे. शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरण बाबत आज पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी, सीईओ, पोलीस अधिकारी, नगराध्यक्ष समीर नलावडे, शिवसेना नेते संदेश पारकर, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सुशांत नाईक, भाई परब, जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर, जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, सुशील सावंत, सुशांत दळवी, अनंत पारकर ,बबलू सावंत , दिपणाईक आदी उपस्थित होते. शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरण बाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत करण्यात येईल असेही सांगण्यात आले. शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरण बाबत शहरात याआधिच संदेश पारकर विरुद्ध समीर नलावडे असा वाद रंगला होता. नलावडे यांनी दिपणाईक वर्कशॉपलगत च्या जागेत पुतळा स्थलांतरित करण्यासाठी हायवे ठेकेदाराला सूचना दिल्यानुसार ठेकेदाराने तसे बांधकाम करण्यास सुरुवात केली होती.याबाबत समजताच गटारालगत शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा नाही अशी भूमिका घेत रातोरात संदेश पारकर यांनी हे बांधकाम बंद पाडले. संदेश पारकर यांनी सध्या जि.प. बांधकाम कार्यालय असलेल्या 23 गुंठे जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारून सुशोभीकरण करत स्मारकनिर्मिती करावी अशी भूमिका घेतली. या राजकीय वादानंतर शिवाजी महाराज पुतळा स्थापन करणाऱ्या शिवाजी चौक मित्रमंडळाने पालकमंत्री उदय सामंत यांचे वारंवार हायवेच्या सर्व्हिस रोडवर आलेल्या शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरण याकडे लक्ष वेधले.कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तर पुढचे पाऊल उचलत कणकवली नगरपंचायत मध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा शिवसेना मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आदी पक्षाच्या नेत्यांची लोकप्रतिनिधींची आणि शहरातील सुजाण प्रतिष्ठित नागरिकांची एकत्रित बैठक बोलावत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या या बैठकीत महिन्याभरात तोडगा काढणार असे दिलेले आश्वासन पालकमंत्र्यांना पूर्ण करता आले नाही.दरम्यान काल 9 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता पालकमंत्र्यांनी शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवाजी चौक मित्रमंडळ व सकल मराठा समाज प्रतिनिधींची भेट घेत 10 जानेवारी रोजी अंतिम निर्णय घेणार असे सांगितले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत जेव्हा दिपणाईक वर्कशॉप लगत च्या जागेवर तात्पुरता पुतळा स्थलांतरीत करावा अशी मागणी झाली तेव्हा पालकमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत अनधिकृतपणे राष्ट्रीय पुरुष असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्याबाबत आधी त्या 18 गुंठे जागेतील अतिक्रमण केलेल्या सर्व स्टॉल ना अतिक्रमण हटाव ची नोटीस देऊन सर्व जमिनीवरील अतिक्रमण हटवून नंतर तेथे अधिकृतपणे शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरित करण्याचा निर्णय दिला.याबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठी शासनाच्या वतीने 16 जानेवारी रोजी आर्किटेक्ट येऊन पाहणी करतील असेही सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!