*कोकण Express*
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी काशीविश्वेश्वर मंदिरात महामृत्युंजय जप…!*
*भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आयोजन…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पंजाब मध्ये सुरक्षेत चूक झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी कणकवली भाजपा महिला मोर्चा च्या वतीने शहरातील काशीविश्वेश्वर मंदिरात 108 महामृत्युंजय जप आज करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण,राजश्री धुमाळे,तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई,ग्रा.प.सदस्य संदीप मेस्त्री,विनिता बुचडे,शहराध्यक्ष प्राची कर्पे,नगरसेविका मेघा गांगण,अण्णा कोदे,पप्पू पुजारे, प्रतीक्षा सावंत,संजना सदडेकर, गणेश तळगावकर,सचिन पारधीये,प्रदीप गावडे,बाबू घाडीगावकर,साक्षी वाळके, मंगला परुळेकर आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.