शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ वा क्रमांक प्राप्त करत कुमार सूरज दिलीप घरपणकर चे घवघवीत यश

शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ वा क्रमांक प्राप्त करत कुमार सूरज दिलीप घरपणकर चे घवघवीत यश

*कोकण Express*

*शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ वा क्रमांक प्राप्त करत कुमार सूरज दिलीप घरपणकर चे घवघवीत यश*

*कासार्डे ः  संजय भोसले*

ऑगस्ट 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत ( इ. ८ वी ) डॉ. श्रीधर रघुनाथ लेले हायस्कूल, मुटाट या प्रशालेचा विद्यार्थी कुमार सुरज दिलीप घरपणकर याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण विभागात सोळावा क्रमांक प्राप्त करत उज्वल यश संपादीत केले.
या यशाबद्दल रवी पाळेकर (सभापती , पं.स. देवगड) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे पदाधिकारी सु.ग. परांजपे (कार्यवाह), रघुनाथराव पाळेकर (सहकार्यवाह) , भास्करराव पाळेकर ( हीरक महोत्सव समिती उपाध्यक्ष) , सौ.अमृता परांजपे ( सदस्या, कार्यकारी समिती), मुख्याध्यापक, शिक्षक व इतर सर्व कर्मचारी यांनी सूरजच्या या यशाबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यावर्षी हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याने सूरजने मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद असल्याचे मत कार्यवाह सु. ग. परांजपे यांनी व्यक्त केले. तसेच मंडळाचे अध्यक्ष विश्वासराव पाळेकर , उपाध्यक्ष धनंजय परांजपे , शिवाजीराव राणे आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी फोन करून सूरजचे अभिनंदन व कौतुक केले. इतर विद्यार्थ्यांनी देखील यातून प्रेरणा घेऊन असेच यश संपादन करावे असे मनोगत सभापती रवी पाळेकर यांनी व्यक्त केले आणि सूरजचे कौतुक करीत अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!