*कोकण Express*
*“अनाथांची माय” सिंधुताई सपकाळ यांना भाजप वेंगुर्लेच्या वतीने श्रद्धांजली…*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
अनाथांची आई सिंधुताई सपकाळ यांना भाजपा वेंगुर्लेच्या वतीने साईदरबार हाॅल येथे श्रद्धांजली वहाण्यात आली. तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर यांचे हस्ते सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी श्रद्धांजली वहाताना ॲड. सुषमा खानोलकर व डाॅ.पुजा कर्पे यांनी सिंधुताई सपकाळ यांचा जिवनपट मांडताना अनाथ मुलांसाठी केलेले कार्य, तसेच शेकडो अनाथ बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि स्वतंत्र ओळख मिळवून देणारी त्यांची माई आणि समाजात “सिंधुताई” म्हणून ख्यातनाम झाली अशी श्रद्धांजली वाहीली.
या श्रद्धांजली सभेला जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर, उपनगराध्यक्षा कु. शितल आंगचेकर, महीला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, जि. का.का. सदस्य साईप्रसाद नाईक – वसंत तांडेल व बाळा सावंत, माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे, नगरसेविका पुनम जाधव, कृपा मोंडकर, श्रेया मयेकर , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, परबवाडा सरपंच पपु परब, ता. उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे , ता. चिटणीस समीर चिंदरकर, समीर कुडाळकर, किसान मोर्चा जि. सरचिटणीस बाळु प्रभु, ता. का.का.सदस्य बिट्टु गावडे , महिला मोर्चाच्या रसीका मठकर, मानसी परब, बुथप्रमुख शेखर काणेकर, नितीश कुडतरकर, विनय गोरे, गुरुनाथ घाडी, वसंत परब नारायण गावडे, युवा मोर्चाचे भुषण सारंग, ओंकार चव्हाण इत्यादी उपस्थित होते .