आशिये ग्रामदैवत गांगो-भैरीचा उद्या जत्रोत्सव

आशिये ग्रामदैवत गांगो-भैरीचा उद्या जत्रोत्सव

*कोकण  Express

*आशिये ग्रामदैवत गांगो-भैरीचा उद्या जत्रोत्सव…*

*वालावलकर दशावतारी महान पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार*

*आंब्रड येथील भगवती ढोलपथकाचे खास आकर्षण..*

*कणकवली : मयुर ठाकूर*

कणकवली तालुक्यातील आशिये ग्रामदैवत गांगो भैरीचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी होत आहे. या जत्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक- सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ८ वाजता- देवतांची नित्य पूजा, दुपारी ३ वाजता माहेरवाशीण ओट्या भरण्याचा कार्यक्रम, सायंकाळी ७ ते १० वाजता भगवती ढोल पथक आंब्रड यांचा ढोल व सनई वादनाचा कार्यक्रम, रात्री १० वाजता हनुमान प्रसादिक भजन मंडळ-वर्दे बुवा गुंडू सावंत यांचे संगीत भजन,रात्री १२ वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळ ओसरगाव यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.तरी सर्व भक्तांनी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आशिये ग्रामस्थ मंडळीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!