*कोकण Express*
*रश्मी ठाकरे यांच्या वरील आक्षेपार्ह ट्विटचा निषेध…*
*कणकवली पोलिसांना शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निवेदन…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्या विरोधात भाजपा सोशल मीडियाचा प्रभारी याच्याकडून झालेल्या आक्षेपार्ह ट्विटचा शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
प्रभारिच जास्त चमकेशगिरी करतात अशा शब्दात महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख नीलम सावंत – पालव यांनी या घटनेचा निषेध केला.पुरोगामी महाराष्ट्रात हा प्रकार निषेधार्थ असून असे गैरकृत्य करणाऱ्यांना कायद्याची जरब बसवावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षकांमार्फत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना देण्यात आले.
समाजात तणाव व गंभीर गुन्ह्याचा तपास करत याप्रकरणी आरोपीला अटक केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अभिनंदनही करण्यात आले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत – पालव, जि प सदस्य स्वरुपा विखाळे, उपसरपंच वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, राजश्री सावंत, अनिशा सावंत, विलास गुडेकर आदी उपस्थित होते.