*कोकण Express*
*कोल्हापूर खंडपीठ व्हावे यासाठी आपला पाठिंबा*
*ओरोस ता.०८-:*
नागरीकांना कमी वेळात आणि कमी खर्चात न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी न्यायालयांचे विकेंद्रिकरण आवश्यकत आहे. औरंगाबाद खंडपीठासाठी सुद्धा विरोध झाला होता. आता त्याचा फायदा अनेक जिल्ह्यातील पक्षकारांना होत आहे. त्यामुळे कोल्हापूर खंडपीठाची येथील वकिलवर्ग व बार कौन्सिलची असलेली मागणी रास्त आहे. म्हणूनच कोल्हापूर खंडपिठासाठी माझा जाहीर पाठंबा आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भूषण गवई यानी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या कंट्युलिअर लीगल एज्युकेशन (क्लेप) कार्यक्रमात बोलताना केले.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र -गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आज ८ जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे कंट्यूनीयर लीगल एज्युकेशन प्रोग्राम (क्लेप)चे आयोजन करण्यात आले होते. बार कौन्सिलने जिल्हातील नवोदीत वकीलांसाठी मार्गदर्शन तसेच कोल्हापूर खंडपीठाचे प्रयत्न या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन सत्रात चालणार्या या कार्यक्रमात पहिल्या सत्रात उदघाटन कार्यक्रम झाला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायाधीश प्रकाश नाईक, सिंधुदुर्ग सुपुत्र तथा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, सर्वोच्य न्यायालयाचे विशेष सरकारी वकील शेखर नाफडे, महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकिल पद्मश्री अँड उज्वल निकम, इंडियन बार असोशिएशन सदस्य तथा जेष्ठ वकिल जयंत जायभावे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश एस व्ही हांडे. सर्वोच्य न्यायालयाचे वकिल अरविंद आवाड, महाराष्ट्र गोवा बार असोशिएशनचे उपाध्यक्ष अँड संग्राम देसाई, रत्नागीरी बार असो. अध्यक्ष अँड दिलीप धारीया, सिंधुदुर्ग जिल्हा बार असो. चे अध्यक्ष अँड राजेद्र रावराणे तसेच महाराष्ट्र गोवा बार असोसीएशनचे राज्य भरातील सर्व सदस्य, सिंधुदुर्ग रत्नागीरी गोवा व कोल्हापूर सांगली सातारा जिल्हयातील वकिलवर्ग, जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, वकील आदी उपस्थीत होते.