*कोकण Express*
*पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते आज ‘प्रज्ञांगण’चा शुभारंभ*
*कासार्डे ः संजय भोसले*
तळेरे येथे रविवार दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता ‘प्रज्ञांगण’ या अनोख्या व्यासपीठाचा शुभारंभ पद्मश्री पुरस्कारप्राप्त परशुराम गंगावणे यांच्या हस्ते होणार आहे.
वैभववाडी गट विकास अधिकारी जयप्रकाश परब, संगीतकार मितेश चिंदरकर, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, एमकेसीएलचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय तेली हे मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
तळेरे दशक्रोशीतील विद्यार्थ्यांना जलद गतीने अभ्यास करण्याच्या तंत्राबरोबरच संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, भाषणकला, बालसंस्कार, संमोहन अशा विविध कलांचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘प्रज्ञांगण’ची निर्मिती करण्यात आली आहे. तळेरे परिसरातील सुजाण व्यक्तींनी एकत्र येऊन हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे तळेरे दशक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे, अशा शब्दांत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ‘प्रज्ञांगण’चे कौतुक केले आहे.
कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम होणार असून उपस्थित राहणा-यांसाठी मास्क बंधनकारक आहे. सदर उपक्रमाच्या शुभारंभाला सर्वांनी मुलांसह उपस्थित राहावे, असे आवाहन प्रज्ञांगण परिवारातर्फे करण्यात आहे.