*कोकण Express*
*कळसुली डोंगरी येथे अज्ञाताची एस टी वर दगडफेक…*
*चालकाला किरकोळ दुखापत : प्रवासी सुखरूप…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवलीहून कळसुलीकडे जाणाऱ्या एसटी बसवर कळसुली डोंगरी येथे अज्ञाताने दगडफेक केली. संबंधित घटनेत चालकाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.
कणकवलीहून कळसुलीकडे निघालेल्या या बसवर सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास कळसुली डोंगरी येथे ही दगडफेक झाली. यावेळी सुमारे ३० विद्यार्थी बस मध्ये होते. सुदैवाने कोणत्याही प्रवाशांना दुखापत झालेली नाही. मात्र दगड बस चालकाच्या हाताला लागल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. एसटीचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले.