सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समोर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जागा द्या

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समोर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जागा द्या

*कोकण  Express*

*सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समोर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जागा द्या…*

*सृष्टी फाऊंडेशनचे रत्नकांत कदम यांचे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना निवेदनातून मागणी..*

*ओरोस ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किंवा जिल्हा परिषदेसमोर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सृष्टी परिवर्तन फाउंडेशन सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष रतन भाऊ कदम यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्याकडे सादर केले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या भारत देशाचे घटनाकार, शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ओरोस येथे भव्य दिव्य स्मारक होण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत याबाबत समाजकल्याण विभागाला पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार समाजकल्याण विभाग सहाय्यक आयुक्‍त सिंधुदुर्ग यांनी आम्हाला स्मारक उभारण्यात करिता निश्चित जागा सुचवावी, असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

त्यामुळे हे स्मारक होण्यासाठी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामागील आणि जिल्हा परिषद समोरील जागा योग्य वाटत आहे. तसेच या जागा या प्राधिकरण विभागाच्या अखत्यारित असल्याने प्राधिकरणाच्या अध्यक्ष म्हणून आपण या दोन्ही जागांपैकी एक जागा स्मारकासाठी देऊन हे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!