*कोकण Express*
*कणकवलीत आधारकार्ड सेवा केंद्र सुरू ; वाचा कुठे सुरु झाली सुविधा*
कणकवली तालुक्यातील नागरिकांसाठी आधार अपडेट व नवीन आधार करण्याकरता कणकवली शहरात बऱ्याच महिन्यांपासून आधार केंद्रे बंद होती.अखेर विदर्भ कोकण ग्रामीण बँक येथे आधार केंद्र सुरु करण्यात आले आहे. तसेच कणकवली तहसील कार्यालयातही आधार केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आधार केंद्र सुरु होणा-या संदर्भात प्रहार च्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला होता त्याला यश प्राप्त झाले आहे.कणकवली तहसील कार्यालय येथील आधार केंद्र हे मंगळवार व शुक्रवार या दोन दिवसांसाठी आठवड्यातून सुरु राहणार आहे.
तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार सुर्यकांत गवस यांच्या हस्ते फित कापून व राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आधार केंद्राच्या शुभारंभ करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी सरचिटणीस रुपेश जाधव,देवेंद्र पिळणकर,संदेश मयेकर, रविभूषण लाड,महा. ई. सेवा व्यवस्थापक प्रसाद जाधव,कणकवली मंडळ अधिकारी राजेश नागावकर,तलाठी श्रीमती कोरगावकर,ग्रामसेवक स्वरा जाधव,रविकिरण सावंत,विनायक गुरव आदी उपस्थित होते.