कुडाळ नगरपंचायतीमधील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन

कुडाळ नगरपंचायतीमधील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन

*कोकण  Express*

*कुडाळ नगरपंचायतीमधील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन…*

*कुडाळ ः प्रतिनिधी* 

मूळचे शहरातील आडवण येथील रहिवासी आणि सध्या कुडाळ येथे वास्तव्यास असलेले सुधीर अनंत चव्हाण (वय-४०) यांचे काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग १६ मधून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. त्याच्या अकाली निधनाने मित्र परिवारास मोठा धक्का बसला आहे.
सुधीर चव्हाण हे भाजपच्या तिकिटावर कुडाळ नगरपंचायतची प्रभाग १६ मधून निवडून लढवत होते. काल रात्री ११.३० वाजता आपल्या प्रभागातील प्रचार आटपून ते कुडाळ मधील भाजपच्या कार्यालयात आले. तेथून पुन्हा कामानिमित्त ज्याठिकाणी गेले त्याच ठिकाणी त्यांना अचानक ह्रदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याने ते खाली कोसळले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई असा परिवार आहे.
कुडाळमधील डाॅक्टर बाणावलीकर यांच्याकडे त्यांचा कृत्रिम दात पुरवठा करण्याचा व्यवसाय होता. मुळचे आडवण येथील चव्हाण हे गेली काही वर्षे कुडाळात व्यवसायानिमित्त स्थायिक झाले होते. ते उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ओळखले जात. त्यांचा मालवण तसेच कुडाळमध्ये मोठा मित्र परिवार होता. क्रिकेट अप्रतिम खेळायचे.त्यामुळे कुडाळात त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. मालवणातील त्यांचा मित्र परिवार शोकाकुल बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!