मधुकर सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन

मधुकर सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन

*कोकण Express*

*मधुकर सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील शिरवल (गाडेसखलवाडी) येथील रहिवासी मधुकर कृष्णाजी सावंत ( वय ८०) यांचे वृद्धापकाळाने मुंबई- ठाणे येथील निवासस्थानी रविवार २ जानेवारी रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे,सुना,पुतणे, नातवंडे असा परीवार आहे.

मधुकर उर्फ आबा सावंत हे मनमिळाऊ स्वभावाचे होते.ते शिरवल गावचे माजी सरपंच होते.शिरवल शिक्षण हितवर्धक मंडळाचे माजी सल्लागार होते.शिरवल गावच्या जडणघडणीत तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यात त्यांचे योगदान मोठे होते.सिने – नाट्य अभिनेते महेश सावंत यांचे ते वडील होत तर शिरवल माजी उपसरपंच रविकांत सावंत यांचे ते काका होत.मधुकर सावंत यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!