पेट्रोलपंप रोख रक्कम चोरी प्रकरणी सशर्त जामीन

पेट्रोलपंप रोख रक्कम चोरी प्रकरणी सशर्त जामीन

*कोकण Express*

*पेट्रोलपंप रोख रक्कम चोरी प्रकरणी सशर्त जामीन*

*जिल्हा न्यायालयाकडून प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता*

*ओरोस ता.०६-:*

खर्येवाडी येथील सिद्धी ऑटोमोबाईल पेट्रोलपंप येथे रोख ५७ हजार रुपये चोरी केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या संशयित पाच आरोपींना येथील मुख्य न्याय दंडाधिकारी ए एम फडतरे यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपींच्यावतीने अशपाक शेख, प्रथमेश नाईक यांनी काम पाहिले.

गोवा येथे आलेल्या अब्दुल रज्जाक अब्दुल हमीद खान (वय ३०), मीर बादशाह शेख (वय २४), प्रमोद प्रकाश गायकवाड (वय ३७), सोहेल युनूस काझी (वय २६) सर्व राहणार घाटकोपर मुंबई व राजेश गुणाजी मासवकर (वय ३४) राहणार ठाणे यांनी मुंबईच्या दिशेने जाताना १ जानेवारी २०२२ रोजी ओरोस खर्येवाडी येथील सिद्धी ऑटोमोबाईल पेट्रोलपंप येथे ५७ हजार रुपयांवर डल्ला मारीत चारचाकी वाहनाने पोबारा केला होता. याबाबत ओसरगांव अपराजवाडी येथील मयूर संतोष सावंत यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

यानंतर पोलिसांनी जोरदार हालचाली करीत करूळ पोलीस ठाण्यात या संशयितांना अवघ्या दोन तासांत वाहणासह ताब्यात घेतले होते.

यानंतर येथील न्यायालयाने त्यांना ६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज पोलीस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या पाचही संशयित आरोपीना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा सशर्त जमीन मंजूर केला आहे. तसेच महिन्यातून एकवेळ पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घातली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!