*कोकण Express*
*जेष्ठ समाजवादी चंद्रकांत तथा बापु नेरुरकर यांचे दुःखद निधन !*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गांवातील जेष्ठ समाजवादी, कुशल राजकारणी, विचारवंत, समाजसेवक चंद्रकांत शांताराम तथा बापु नेरुरकर (८४ वर्ष) यांचे वृध्दापकाळातील आजाराने दुःखद निधन झाले. गेली अनेक दशके अन् रत्नागिरी जिल्हा विभाजनापुर्वीपासुन राजकारण व समाजकारणात त्यांनी आपले सौदार्हपुर्ण व्यक्तीमत्व जपले होते. समाजवादी, नंतर जनता दल सरचिटणीसच्या माद्यमातुन बॅ. नाथ पै, मधु दंडवते, पासुन पुष्पसेन सावंत पर्यंत अनेकांशी त्यांची जवळीक होती. अखंड रत्नागिरी जिल्ह्याचे जि. प. सदस्य म्हणुन त्याचे काम मार्गदर्शक होते.
फोंडाघाट एज्यु. सोसा. च्या संस्थापनेत, बॅ. नाथ पै वाचनालयाची निर्मीती आणि गांवच्या उत्थापनात त्यांचे महत्वपुर्ण योगदान होते. त्यांच्या पश्चात पत्नी तसेच वीज महामंडळातील प्रदिप, शिक्षणप्रेमी रंजन व सर्पमित्र संजय यासह भाऊ, बहिणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जेष्ट माजी हाॅटेलमालक नाना नेरुरकर त्यांचे बंधु होत. त्यांच्या अंत्ययात्रेत सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते. बापुंच्या जाण्याने फोंड्याचा सच्चा मार्गदर्शक हरवल्याचे दुःख परिसरात व्यक्त होत आहे.