मी शिवसेनेशी गद्दारी केली नाही

मी शिवसेनेशी गद्दारी केली नाही

*कोकण Express*

*मी शिवसेनेशी गद्दारी केली नाही*

*शिवसैनिक म्हणून काम करणार :शरद वायंगणकर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शरद वायंगणकर यांची आज जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी हकालपट्टी केल्याबाबत माहिती माध्यमांना दिल्यानंतर यासंदर्भात शरद वायंगणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपल्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. या प्रसिद्धीपत्रकात श्री. वायंगणकर यांनी म्हटले आहे, जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी माजी उपतालुकाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्याचे मला माध्यमांच्या बातम्यांवरून समजले. मात्र मी शिवसेना पक्षाशी कोणतीही गद्दारी केलेली नाही. ज्यावेळी शिवसेनेचे तत्कालीन नेते नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळी शिवसेनेच्या जिल्ह्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेना सोडून शिवसेनेशी गद्दारी केली. मात्र त्यावेळीही मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक बनुनच शिवसेनेत राहिलो. त्यावेळी कठीण परिस्थितीत पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली ती मी निष्ठेने व प्रामाणिकपणे सांभाळली.

जिल्हा बँक निवडणुकीत मी मतदार नसतानाही मला कोणतेही कारण न देता गद्दार ठरवत माझी हकालपट्टी केल्याचे मला समजले. मात्र मी आईसमान मानलेल्या शिवसेनेशी कधीही गद्दारी केली नाही व करणारही नाही. मी कायम बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणूनच कार्यरत राहणार असल्याचे शरद वायंगणकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!