*कोकण Express*
*कृषी महाविद्यालये वगळता राज्यातील सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद*
*मुंबई*
राज्यातील कृषी महाविद्यालये वगळता सर्व महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतीत. या काळात ऑनलाईन वर्ग सुरु राहतीत. तर सर्व विद्यापीठ आणि संलग्न महाविदयालयाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होतीत. अशी माहिती आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सामंत यांनी सांगितले.