*कोकण Express*
*वैभववाडी नगरपंचायतच्या आरक्षणाची सोडत प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर..*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत आज सकाळी चिठ्या उडवून पार पडली. १७ जागांसाठी प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी वैभववाडी तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अतुल जाधव व मुख्याधिकारी सुरज कांबळे उपस्थित होते.
१७ जागांसाठी सृष्टी शेळके या मुलीने व शेळके या मुलाने सोडतीच्या चिट्ठ्या काढून सुरवात केली. यावेळी मुख्याधिकारी सुरज कांबळे, यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये १७ जागांसाठी कोणती आरक्षणे जाहीर झाली ती मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी जाहीर केली.
त्यामध्ये वॉर्ड १ ना मा प्र खुला, वॉर्ड २ खुला महिला, वॉर्ड ३ ना मा प्रा महिला, वॉर्ड ४ सर्वसाधारण महिला, वॉर्ड ५ ना मा प्रा महिला, वॉर्ड ६ अनुसूचित जाती सर्वसाधारण, वॉर्ड ७ खुला सर्वसाधारण, वॉर्ड ८ खुला सर्वसाधारण, वॉर्ड ९ अनुसूचित जाती महिला, वॉर्ड १० खुला प्रवर्ग,वॉर्ड ११ अनुसूचित जमाती महिला, वॉर्ड १२ खुला प्रवर्ग, वॉर्ड १३ खुला प्रवर्ग, वॉर्ड १४ ना मा प्र सर्वसाधारण, वॉर्ड १५ ना मा प्रा महिला, वॉर्ड १६ सर्वसाधारण महिला, वॉर्ड १७ सर्वसाधारण महिला या सर्व वॉर्ड मध्ये आता आरक्षण निश्चित झाले असून प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध दिनांक १८ नोव्हेंबर २०२० बुधवारी जाहीर होणार आहे. तसेच हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी बुधवार १८ ते गुरुवार २६ नोव्हेंबर दुपारी ३ पर्यंत असणार आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीची तारीख निवडणूक विभाग जाहीर करणार असल्याचे समजते.
त्यामुळे वाभवे वैभववाडी नगर पंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजण्याचे आता निश्चित झाले आहे. या निवडणुकीचे व निकालाचे दिनांक लवकरच समजणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आता कोणाचा पत्ता कट होणार व कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही नवीन चेहरेहि रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
मागील निवडणुकीत आमदार नितेश राणे यांची एक हाती सत्ता होती. आता येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना आपली ताकद दाखवत सत्ता खेचून आणणार का? कि पुन्हा राणे बाजी मारणार हे आता होणाऱ्या निवडणुकीतच समजेल.