क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थाने देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी- सौ.रिया भांबू

क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थाने देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी- सौ.रिया भांबू

*कोकण Express*

*क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थाने देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी- सौ.रिया भांबूरे*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थानं देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. सावित्रीबाईंनी स्त्रीसक्षमीकरणासाठी काम केलं. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला.त्या सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला व्यापार व उद्योग विभागाच्या तालुकाध्यक्षा सौ.रिया भांबूरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तळेरे येथील स्वीटलॅन इंग्लिश मिडीयम या हायस्कूल मध्ये अभिवादन करताना काढले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला व्यापार व उद्योग विभागाच्या तालुकाध्यक्षा सौ.रिया भांबूरे यांनी स्वीटलॅन इंग्लिश मिडीयम या हायस्कूल मध्ये जाऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना सौ.भांबूरे म्हणाल्या की, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंची समर्थ साथ लाभली. देशात स्त्रियांची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरु केली आणि त्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका होण्याची जबाबदारी सावित्रीबाईंनी उचलली.स्त्रियांच्या शिक्षणासाठी या दोघांनी केलेलं कार्य व घेतलेले कष्ट सदैव स्मरणात राहतील. देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहे.स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे, याचं श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात स्त्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट व सहन केलेल्या हालअपेष्टांना आहे.जयंतीदिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलें यांना विनम्र अभिवादन. यावेळी या कार्यक्रमात आशा करलकर,सौ.सुप्रिया पिंगुळकर,स्नेहल पाताडे तसेच शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!