राजन तेली यांचा राजीनामा नामंजूर

राजन तेली यांचा राजीनामा नामंजूर

*कोकण Express*

*राजन तेली यांचा राजीनामा नामंजूर!*

*प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्या पुढील वाटचालीला शुभेच्छा!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी राजन तेली हेच यापुढेही कार्यरत राहणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पराभवा नंतर तात्काळ श्री तेली यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविलेला राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे.

श्री. पाटील यांनी राजन तेली यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपले दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाचे राजीनामा पत्र प्राप्त झाले. आपला राजीनामा अस्वीकारार्ह आहे.

आपल्या नेतृत्वात स्थानिक संस्था, सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये भरीव यश प्राप्त झाले तसेच संघटनात्मक वाढ ही झाली आहे. त्यामुळे भविष्यातही आपल्या नेतृत्वात निवडणुका लढवून त्यात भरघोस यश प्राप्त होईल, असा आम्हाला विश्वास आहे.आपल्या आगामी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. देखील दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!