*कोकण Express*
*कासार्डेतील विद्यार्थ्यांचा लसवंत होण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद…*
*पहिल्याच दिवसी ४०विद्यार्थानी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस*
*कासार्डे ः संजय भोसले*
शासनाने १५ते १८वयोगटातील विद्यार्थ्यांना कोवॅक्सिन मोहीम काल ३जानेवारीपासून सुरू केली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ते १८ वयोगट लसीकरण मोहीमेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत विद्यार्थी लसीकरण मोहीमेचा कासार्डे माध्यमिक विद्यालयात प्रारंभ झाला, याप्रसंगी कासार्डे शिक्षणसंस्थेचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, प्राचार्य एम.डी.खाड्ये,कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या द्वितीय वैद्यकीय अधिकारी श्रीम.एस.एस.पालांडे, केंद्रप्रमुख संजय पवार,जेष्ठ शिक्षक सौ.बी.बी.बिसूरे, क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड काॅलेजचे सर्व प्राध्यापक विनायक पाताडे,देवेंद्र देवरूखकर, आरोग्य सेविका श्रीम. जी.जी.शिरकर,एन.एन.
सामंत, आरोग्य सेवक जी.के. तेली,श्रीम. व्ही.एस. वळंजू,श्रीम. डी.एस. धुरे,आशा सानिका राणे,व्ही.एन.केसरकर आदी उपस्थित होते.
१५ ते १८वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र कासार्डेच्या वतीने करण्यात आले.
कासार्डे विद्यालयात विद्यार्थी लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.पालांडे, संस्था पदाधिकारी कुडतरकर
प्राचार्य एम. डी.खाड्ये.