*कोकण Express*
*दहशदवादा नंतर आता धनशक्ती विरोधात लढणार*
*आ केसरकर:जिल्हा बँक पराभवाने खचणार नाही*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मी जिल्ह्यातील दहशतवादाच्या विरोधात वारंवार लढत आलो असून, यापुढे धनशक्ती विरोधात लढणार असल्याची माहीती आमदार दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
तसेच केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, जरी यावेळी जिल्हा बँक मध्ये आमचा पराभव झाला असला तरी येणाऱ्या निवडणूकी मध्ये आम्ही ताकदीने उतरू आणि विजय मिळवू असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.