*कोकण Express*
*आमदार राणेंचा नाही तर हा धनशक्तीचा विजय…*
* दीपक केसरकर यांचा आरोप…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गातील लोक राणेंना कंटाळली असून, राणे जिल्हा बँक हरणार म्हणून वरिष्ठांनी जिल्हात कुमक पाठवल्यानेच जिल्हा बँक आमच्या हातून गेली आहे. हा राणेंचा नाही तर धनशक्तीचा विजय असल्याचा टोला आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे. यावेळी त्यांनी आमचा झालेला पराभव आम्ही 100 टक्के मान्य करतो. असे मत त्यानी व्यक्त केले.