*कोकण Express*
*कणकवलीत ग्रा.पं.पोटनिवडणुकीसाठी १६ उमेदवारी अर्ज दाखल*
*तीन ग्रा.पं.मध्ये एकही अर्ज प्राप्त नाही;काही जागा झाल्या बिनविरोध*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूकांसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी आपले १३ तर पहिले ३ एकूण १६ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. ओझरम,वायंगणी,बेळणे खुर्द या ग्रामपंचायतमधील जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही.
ओबीसी आरक्षित असलेल्या प्रभागांमध्ये निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्वसाधारण प्रवर्ग होऊन हा निवडणुक कार्यक्रम घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचे नांव-कुरंगवणे प्रभाग १-सर्वसाधारण रविंद्र वासुदेव कुडाळकर,शेर्पे प्रभाग २- सीराज गफार मुजावर, ओझरम प्रभाग २ सर्वसाधारण(निरंक),प्रभाग ३ सर्वसाधारण स्त्री(निरंक), माईण प्रभाग ३ सर्वसाधारण -नितीन जयवंत पाडावे, श्रीकृष्ण रमेश घाडीगांवकर,वायंगणी प्रभाग ३-निरंक,बेळणेखुर्द प्रभाग -३सर्वसाधारण स्त्री(निरंक),करंजे प्रभाग२-सर्वसाधारण गणेश मंगेश तळगावकर, कळसूली प्रभाग ४ सर्वसाधारण-चंद्रशेखर मधुकर चव्हाण, बाबाजी वासुदेव मुरकर, प्रसाद सखाराम कानडे,डामरे प्रभाग-३सर्वसाधारण स्त्री-पुजा शैलेश कानडे,जानवली प्रभाग ३- दामोदर आबाजी सावंत, दिलीप गणपत हिर्लेकर, राजेश सदानंद शेटये,भालचंद्र दत्तात्रय दळवी, प्रशांत नारायण राणे, संतोष महादेव कारेकर,हरकुळ बुद्रुक-प्रभाग ४-सर्वसाधारण-सुहास राजाराम पावसकर आधी उमेदवारांनी आपले अर्ज ग्रामपंचायत पोट निवडणुकांसाठी दाखल केले आहेत.