*कोकण Express*
*महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा “युवा प्रतिभाशाली पत्रकार” डी एस एन चे संपादक प्रमोद गवस यांना*
*ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार शिरीष नाईक यांना, उदयोन्मुख पत्रकार पुरस्कार गोविंद शिरसाट यांना*
*दोडामार्ग ः लवू परब*
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, दोडामार्ग तालुक्याचे पुरस्कार जाहीर झाले असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार सिंधुदुर्ग अपडेट न्यूज चे संपादक शिरीष नाईक यांना जाहीर करण्यात आला तर युवा प्रतिभाशाली पत्रकार पुरस्कार डी एस एन चे संपादक प्रमोद गवस यांना आणि उदयोन्मुख पत्रकार पुरस्कार गोविंद शिरसाट यांना जाहीर झाला.
आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण या वृत्त पत्राच्या वर्धापनदिन “पत्रकार दिनाच्या” निमित्ताने ६ जानेवारीला ह्या पुरस्काराचे वितरण दोडामार्ग मध्ये होणार आहे. हे पुरस्कार जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व कार्यकारिणी यांनी राज्य समितीच्या अनुमतीने जाहीर केले असून त्याला तालुका अध्यक्ष तुळशीदास नाईक, खजिनदार सुमीत दळवी व सचिव प्रशांत नाईक यांनी विशेष सहकार्य लाभले.