*कोकण Express
*कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे भगवान लोके यांचा सत्कार*
*असलदे सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल कौतुक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी असलदे चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार भगवान लोके यांचे निवडीबद्दल कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
यावेळी पत्रकार संघाचे सचिव संजय राणे,खजिनदार नितीन कदम,उपाध्यक्ष उत्तम सावंत,मिलींद डोंगरे,तुळशीदास कुडतडकर,हेमंत वारंग,गुरुप्रसाद सावंत,भास्कर रासम,रमेश जामसंडेकर, रंजीता तहसिलदार आदींसह तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.