*कोकण Express*
*पुरहानीची नुकसान भरपाई शासनाकडून महसूल विभागाकडेम महाविकास आघाडी सरकारकडून ५७ लाख रुपयांचा पहिला हप्ता जमा..*
*बाबुराव धुरी;दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना वाटप करण्याची तहसीलदारांकडे मागणी…*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
तालुक्यात गेल्यावर्षी झालेल्या पुरहानीची नुकसान भरपाई शासनाकडून महसूल विभागाकडे जमा झाली आहे.महाविकास आघाडी सरकारकडून ५७ लाख रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला आहे. आहे.त्यामुळे महसूल विभागाने नुकसान भरपाई दिवाळी सणापूर्वी वाटप करून पूरग्रस्तांना दिलासा द्यावा,अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दोडामार्ग तहसीलदार यांच्याकडे केली आहेगेले सहा महिने श्री.धुरी याचा पाठपुरावा शिवसेना आमदार-खासदार व पालकमंत्री यांच्याकडे करत होते.तरी त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.
श्री धुरी यांनी खासदार विनायक राऊत,पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्याकडे गेले सहा महिने पाठपुरावा करत होते.त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.तालुक्यातील कोनाळकट्टा, वायगणतड, घोटगे, परमे,मणेरी,सासोली आदी गावातील लोकांचे या पुराने मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे शासनाने पंचनामे करून मदत जाहीर केली आहे.