ओरोस पेट्रोल पंप लुट प्रकरणात वैभववाडी पोलीसांनी कौतुकास्पद कामगिरी

ओरोस पेट्रोल पंप लुट प्रकरणात वैभववाडी पोलीसांनी कौतुकास्पद कामगिरी

*कोकण Express*

*ओरोस पेट्रोल पंप लुट प्रकरणात वैभववाडी पोलीसांनी कौतुकास्पद कामगिरी*

*सिंधुदुर्ग*

काल शनिवारी सकाळी कन्ट्रोलवरुन ओरोस सिध्दी ऑटोमोबाइल पेट्रोल पंपावर एका मारुती सिलिरीओ कारमधून आलेल्यांनी ५७ हजार रुपये लुटल्याची घटना समजल्यावर मी तात्काळ जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला सतर्कतेचे आदेश दिले .या लुटमारीतील आरोपी जेरबंद झाले.जर जिल्ह्याची हद्द ओलांडून घाट चढून गेले असते तर थोडं कठीण झाले असते असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सांगितले.
ओरोस पेट्रोल पंप लुट प्रकरणात वैभववाडी पोलीसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.असे सांगतानाच या प्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपीकडून आणखीही काही लुटमारीच्या घटना उघड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.या आरोपींकडे 29 मोबाईल सापडले आहेत.यावरुन मोबाइल चोरीसह अनेक गुन्हे उघड होवू शकतात हे सांगतानाच लुटमारीच्या घटनेत काही तासांत आरोपी पकडले गेले हे वैभववाडी पोलीसांची कर्तव्यदक्ष कामगिरी आहे .. याबद्दल पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कौतुक करताना समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!