*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…*
*सिंधुदुर्गनगरी,ता.०१:*
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ७६० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.