खारेपाटण हायस्कूल येथे शिशुविहार व प्राथमिक विभागाचा बक्षीस वितरण सोहळा दिमाखात संपन्न

खारेपाटण हायस्कूल येथे शिशुविहार व प्राथमिक विभागाचा बक्षीस वितरण सोहळा दिमाखात संपन्न

*कोकण Express*

*खारेपाटण हायस्कूल येथे शिशुविहार व प्राथमिक विभागाचा बक्षीस वितरण सोहळा दिमाखात संपन्न*

*खारेपाटण ः प्रतिनिधी*

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ न. म. विद्यालय खारेपाटण येथे बुधवार दिनांक 29/ 12/ 2021 रोजी शिशुविहार व प्राथमिक विभागाचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. कळंत्रे सर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी लोकरे साहेब होते.

शिशुविहार व पहिली ते चौथीच्या सुमारे 35 विद्यार्थ्यांना एकूण 75 बक्षिसे देण्यात आली. या बक्षीस मध्ये ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेची बक्षिसे तसेच शालेय स्तरावरील ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांची बक्षिसे यांचा समावेश होता.

या कार्यक्रम प्रसंगी दर्पे मॅडम यांनी प्रस्तावना केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात प्राथमिक शिक्षण किती महत्वाचा आहे हे शाळेचे पर्यवेक्षक श्री सानप सर यांनी आपल्या भाषणात सांगितले. तसेच विजय देसाई सर यांनी या कार्यक्रमासाठी सुमारे 75 बक्षिसे दिली. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री कळंत्रे सर, अध्यक्ष श्री लोकरे सर, देसाई सर तसेच इतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष श्री दादा कर्ले, संचालक श्री भाऊ राणे, प्राध्यापक डॉक्टर कांबळे सर, वारंगे सर ,राजू वरुणकर सर आदी पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक श्री. आकिवटे सर उपस्थित होते. अशा प्रकारे मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .काझी मॅडम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!