*कोकण Express*
*आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभूर्ले येथील स्मारकाची साफसफाई व स्वच्छता मोहीम राबवून ३१ डिसेंबर वेगळ्या पद्धतीने साजरा*
*नव वर्षाचे स्वागत सामाजिक बांधिलकीने साजरे*
*कासार्डे ः संजय भोसले*
श्रावणी कंप्युटर तळेरे आणि मेधांश कंप्युटर कासार्डे तसेच तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ डिसेंबर अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येतो.गेल्या तीन वर्षापासून आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मस्थळी पोंभूर्ले येथील स्मारकाची व परिसराची साफसफाई व स्वच्छता मोहीम राबवून ३१ डिसेंबर वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
पोंभूर्ले येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकस्थळी हा कार्यक्रम मागील तीन वर्षापासून आयोजित करण्यात येतो.यावेळी श्रावणी कंप्युटर आणि मेधांश कंप्युटरच्या विद्यार्थ्यांनी स्मारक परिसराची स्वच्छता करून वनभोजन केले.या विद्यार्थ्यांनी भरकटलेल्या तरुणाई पुढे वेगळा आदर्श घालून दिला आहे.
३१ डिसेंबर जगभरात सर्वत्र साजरा केला जातो.यामध्ये बहुतांश कार्यक्रम मद्यधुंद होऊन साजरे होतात.या अशा कार्यक्रमांना फाटा देत युवा पिढीला चांगले संस्कार देण्यासाठी तसेच त्यांच्यातील कौशल्य विकास व्हावा,समाजीक आवड निर्माण व्हावी त्याचबरोबर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा इतिहास माहिती व्हावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो.
या संगणक प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास तसेच सामाजिक बांधिलकीचे बीज रुजविण्याच्या प्रयत्नाने सतत नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करत असतात.
यंदाही मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर स्मारक पोंभूर्ले येथे
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताचा अनोखा प्रयोग सलग चौथ्या वर्षी कायम ठेवला आहे. यानिमित्ताने बाळशास्त्री जांभेकर यांबद्दल माहिती व्हावी यासाठी हे ठिकाण निवडले जाते. सर्व उपस्थितांनी पोंभूर्ल येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारकाची व परिसराची साफसफाई केली.तसेच संपूर्ण स्मारक धुऊन स्वच्छ केले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आनंद घेतला.
यावेळी निसर्ग मित्र परिवारचे अध्यक्ष व तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे सचिव संजय खानविलकर, उपाध्यक्ष उदय दुदवडकर, पत्रकार विष्णू धावडे, सुधाकर जांभेकर,तसेच श्रावणी कंप्युटर संचालक सतिश मदभावे, सौ.श्रावणी मदभावे,रीना दुदवडकर,अमोल धुमाळ, प्रथमेश पौळ, प्रणाली मांजरेकर, राहुल सोमले, मेधांश आणि श्रावणी कंप्युटरचे विद्यार्थी अदिती खानविलकर, रोशन पाजवे, हरेंद्र गुरव, प्रणिता कांबळे, अक्षता कांबळे, कोमल आंबेरकर ,स्वस्तिक रांबाडे, आरिफ सोलकर, हितेश घाडी आदी सहभागी झाले होते.