*कोकण Express*
*जिल्हा बँकेचे विजयी उमेदवार दिलीप रावराणे यांचे वैभववाडीत जल्लोषी स्वागत…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
जिल्हा बँक निवडणुकीत विजयी झालेले भाजपाचे उमेदवार दिलीप रावराणे यांचे वैभववाडीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल-ताशाचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी नूतन संचालक दिलीप रावराणे यांना पेढा भरवून अभिनंदन केले. तसेच त्यांचे पुष्पगुच्छ देऊन भाजपाच्यावतीने जंगी सत्कार करण्यात आला.
यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती भालचंद्र साठे, उपसभापती अरविंद रावराणे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, संजय सावंत, सुनील भोगले, किशोर दळवी, प्रकाश पाटील, रमेश शेळके, सुनील रावराणे, संताजी रावराणे, आदेश रावराणे, शरद कांबळे, संतोष कुडाळकर, प्रकाश शेलार, प्रकाश सावंत, संतोष रावराणे, उदय पांचाळ, आशिष रावराणे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो – विजयी उमेदवार दिलीप रावराणे यांच्यासोबत आनंद साजरा करताना वैभववाडी भाजपा कार्यकर्ते.