*कोकण Express*
*राजन तेलींचा भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा…*
*सावंतवाडी ःःप्रतिनिधी*
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वच्या सर्व जागा मिळविण्यात अपयश आल्याने राजन तेली यांनी आज भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. दरम्यान यापुढे भाजपचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचे श्री. तेली यांनी स्पष्ट केले आहे.