राजन तेलींच्या एका डोळ्यात ‘आसू’ तर एका डोळ्यात ‘हसू’मात्र भाजपची सत्ता आणण्यात यश

राजन तेलींच्या एका डोळ्यात ‘आसू’ तर एका डोळ्यात ‘हसू’मात्र भाजपची सत्ता आणण्यात यश

*कोकण Express*

*कोकण Express*

*राजन तेलींच्या एका डोळ्यात ‘आसू’ तर एका डोळ्यात ‘हसू’ मात्र भाजपची सत्ता आणण्यात यश…*

*सिंधुदुर्गनगरी,ता.३१:*जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले असतानाच भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांच्या एका डोळ्यात ‘आसू’ तर एका डोळ्यात ‘हसू’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. श्री. तेली यांनी भाजप जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले आहे. तर नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा करिश्मा सुद्धा बऱ्यापैकी चालला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वजण विरोधात असताना सुद्धा या ठिकाणी भाजपचे अस्तित्व त्यांनी कायम राखले आहे.
आज झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत श्री. तेली यांना यश मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या विरोधात उभे असलेले शिवसेनेचे सुशांत नाईक यांनी त्यांचा पराभव केला आहे. त्यामुळे त्यांचा पराभव पक्षाच्या दृष्टीने सुद्धा जिव्हारी लागणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!