*कोकण Express*
*विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचा अतुल काळसेकर यांनी केला पराभव…*
*सिंधुदुर्ग;ता.३१*
जिल्हा बँक निवडणुकीत आज दोन धक्कादायक निकाल पाहायला मिळाले.महाविकास आघाडीचे दोन दिग्गज अध्यक्ष सतीश सावंत व उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभव पत्करावा लागला आहे.तर भाजपच्या अतुल काळसेकर यांनी दळवी यांचा पराभव करत थेट जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे.विठ्ठल देसाई यांनी चिट्ठीच्या आधारे विजय मिळवला आहे.