प्रत्येक फेरीत 8 टेबलांवर मतमोजणीला सुरुवात ;माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे मतमोजणी

प्रत्येक फेरीत 8 टेबलांवर मतमोजणीला सुरुवात ;माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे मतमोजणी

*कोकण Express*

*प्रत्येक फेरीत 8 टेबलांवर मतमोजणीला सुरुवात ;माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे मतमोजणी*

*सिंधुदुर्ग*

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे ही मतमोजणी होत आहे. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्या नियंत्रणाखाली ही मतमोजणी सुरू झाली असून एका फेरीत आठ टेबल लागणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक यावेळी राज्यात बहुचर्चित ठरली आहे. जिल्हा बँकेसाठी एकूण १९ संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ९८१ मतदार निश्चित झाले होते. ३० रोजी झालेल्या मतदानावेळी ९६८ मतदारांनी मतदान केले आहे. १३ मतदारांनी मतदान केले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना व अपक्ष मिळून महाविकास आघाडी समृद्धी विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात आहेत. तर भाजप सिद्धिविनायक परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात होते. दोन्ही बाजूने निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी कोणाचे नशीब घडवले आहे आणि कोणाच्या पदरात अपयश टाकले आहे, हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!