मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील स्मारकाची आज ३१ डिसेंबर रोजी स्वच्छता मोहीम

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील स्मारकाची आज ३१ डिसेंबर रोजी स्वच्छता मोहीम

*कोकण Express*

*मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील स्मारकाची आज ३१ डिसेंबर रोजी स्वच्छता मोहीम*

*कासार्डे ः संजय भोसले*

श्रावणी कंप्युटर,तळेरे व मेधांश कंप्युटर इन्स्टिट्यूट,कासार्डे आणि तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने
पोंभुर्ले येथील मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारकाची स्वच्छता मोहीम आज ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० राबविण्यात येणार आहे.

सलग चौथ्या वर्षी हा स्वच्छता मोहीमेचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
नवीन वर्षाच्या स्वागताच्या नावाखाली बहुतांश ठिकाणी तरुणाई मद्यधुंद पार्ट्यांमध्ये रममाण होण्यात धन्यता मानताना दिसते.मात्र याला फाटा देऊन नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ३१ डिसेंबर रोजी श्रावणी कंप्युटर,तळेरे आणि मेधांश कंप्युटर इन्स्टिट्यूट,कासार्डे व तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ यांनी सलग चौथ्या वर्षी बाळशास्त्री जांभेकर स्मारक परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.
तरी या स्वच्छता मोहीमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!