*कोकण Express*
*सतीश सावंत यांना अटक करा; संजना सावंत*
*पोलीस स्थानकात तक्रार देण्याचे काम सुरू…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवलीतील मतदान केंद्रावर मोबाईल आणू नये असे निवडणूक निर्णय अधिकार्यांचे निर्देश असतानाही जिल्हा बँकेचे उमेदवार सतीश सावंत यांनी याठिकाणी मोबाईल नेला. या घटनेला जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी आक्षेप घेतला. त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर सौ. संजना सावंत यांनी पोलीस ठाणे गाठून आक्षेपार्ह विधान व अपमानजनक चागणूक दिल्याप्रकरणी सतीश सावंत यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाल्या आहेत.
मतदान केंद्रावर घडलेला प्रकार व्हिडीओ क्लीप आपल्याकडे असून मला अपमानास्पद वागणूक देत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सतीश सावंत यांना अटक करा, अशी संजना सावंत यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे . पं. स. सदस्य सुजाता हळदीवे, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेविका मेघा गांगण, कलमठ ग्रा. प. सदस्य स्वप्नील चिंदरकर, आदी उपस्थित होते.