*कोकण Express*
*आम.नितेश राणे यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला….!*
*कोर्टाच्या निर्णयानंतर सतीश सावंत यांनी दिली प्रतिक्रिया…!*
*शिवसैनिकाने फोडले फटाके…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आपले वडील केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे आपले कोणीही काही करू शकत नाहीत असा आम.नितेश राणे यांचा भ्रम होता. शिवसैनिक संतोष परब यांच्या वर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे त्यामुळे नितेश राणे यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला असल्याची प्रतिक्रिया जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या नंतर आम नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती यावर दोन दिवस सुनावणी झाल्यानंतर आज न्यायाधीश एस वि हांडे यांनी निर्णय देत जमिनाचा अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, कोर्टाच्या या निर्णयानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालय समोर फटाके फोडत घोषणाबाजी देत कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.